मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील खानपानासाठी कोट्यवधींची निविदा; संतांच्या महाराष्ट्रात जनतेच्या करातून मांसाहाराला प्रोत्साहन?
भूतदयेचा संदेश देणाऱ्या संतपरंपरेच्या भूमीत सार्वजनिक निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये नाराजी मुंबई,दि.२२ जुलै २०२६ मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी खानपानासाठी सुमारे ९.८५ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाली आहे. निविदेतील खानपान यादीमध्ये विविध मांसाहारी पदार्थांचाही समावेश असल्याचे वृत्तपत्रीय माहितीत नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र ही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या करुणा, भूतदया आणि सर्व जीवमात्रांप्रती दयेचा संदेश देणारी भूमी म्हणून ओळखली जाते. अशा राज्यात जनतेच्या करातून जमा झालेल्या सार्वजनिक निधीचा वापर मांसाहारी भोजन व्यवस्थेसाठी केला जाणे योग्य आहे का, असा प्रश्न काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे राज्याच्या सत्तेत मुख्यमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळातही महिलांचे प्रतिनिधित्व आहे. महिलांच्या नेतृत्वाबद्दल अभिमान व्यक्त केला जात असताना सार्वजनिक जीवनात साधेपणा, संवेदनशीलता आणि सांस्कृ...